‘रामायण’मधील ‘शुर्पनखा’ रेणु खानोलकर आता आहेत ‘या’ पक्षाच्या नेत्या, कधी होत्या गोविंदाच्या ‘क्लासमेट’


पोलीसनामा ऑनलाईन :
सध्या डीडी नॅशनलवर सुरू असणारी रामानंद सागर यांची रामायण ही मालिका खूपच लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. या मालिकेत शुर्पनखाची भूमिका रेणु खानोलकर यांनी साकारली आहे. 55 वर्षीय रेणु आता काँग्रेसच्या नेत्या आहेत.

रेणु यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रामायणच्या आधी त्या एक थिएटर आर्टीस्ट होत्या. शुर्पनखाचा रोल केल्यानंतर मात्र त्यांना सारेच ओळखायला लागले होते. शूर्पनखाच्या हसण्यानं माझ्यासाठी अनेक दरवाजे उघडले होते असं त्या सांगतात.

रेणु सांगतात, “मी दोन महिने उमरगावमध्ये रामायणची शुटींग केली होती. यासाठी मला 30 रुपये मिळाले होते. यानंतर मला बीआर चोपडा यांची सीरियल चुन्नीमध्ये काम मिळालं होतं. याशिवाय मी हेमा मालिनींनी डायरेक्ट केलेल्या दिल आशना सिनेमातही काम केलं आहे.

रेणु म्हणाल्या, “1984 मध्ये मी मुंबईला गेले होते. तेव्हा मी 20 वर्षींची होते. मी पुराणमतवादी पंजाबी कुटुंबातून आहे. माझ्या कुटुंबात सिनेमात काम करण्यासाठी परवानगी नव्हती. मला अॅक्ट्रेस व्हायचं होतं. मला आईनं साथ दिली. मुंबईत मी रोशन तनेजाकडे अॅक्टींग क्लास लावला होता. तिथं गोविंदा माझा क्लासमेट होता. यानंतर मी थिएटरमध्ये काम करू लागले. इतं पापाजी(रामानंद सागर) यांनी मला पाहिलं.”

रेणु सध्या मुंबईत अंधेरीला राहते. तिथं ती पती आणि मुलांसोबत वास्तव्य करते.