धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या बॅनरवर नेत्यांच्या जातीचा उल्लेख

पाटणा : पोलीसनामा ऑनलाईन

धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वेगळाच कारनामा  पाहायला मिळाला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये बॅनर लावले असून त्या बॅनरवर नेत्याच्या फोटो आणि त्या फोटोखाली त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.  बॅनरवर अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित इतर नेत्यांच्या फोटोसोबत त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b0a4f15e-c228-11e8-9039-836406c1e8ea’]
या बॅनरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही फोटो लावण्यात आला असून त्याखाली ब्राह्मण समुदाय असे लिहीण्यात आले आहे. अल्पेश ठाकूर यांच्या फोटोखाली मागासवर्गीय तर शक्तीसिंह गोहिल यांच्या फोटो खाली राजपूत समाज असे लिहीण्यात आले आहे.

पुणे / पिंपरी : बेपत्ता झालेल्या ७ वर्षाच्या मुलीचा खून

बॅनरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बिहारमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इन-चार्ज शक्तिसिंह गोहिल यांचे आभार मानण्यात आले आहेत. नव्या काँग्रेस समितीची नियुक्ती केल्याने त्यांचे आभार मानत, सामाजिक सौदार्हाचं उदाहरण ठेवल्याबद्दल हे आभार मानण्यात आले आहेत.बिहारची राजधानी पाटणामध्ये अनेक ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B07418TNB1,B07B6DM75J,B076H51BL9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c5c36f59-c228-11e8-a9f3-176d78d629ad’]
बॅनरवरुन झालेल्या वादानंतर काँग्रेस नेत्यांनी कोणतंही भाष्य करणं टाळलं असून भाजपाला टीका करण्याची संधी मिळाली आहे. राहुल गांधींनी माफी मागण्याची भाजपाने मागणी केली आहे .