आयारामांच्या पूर्वीच्या भाजप विरोधातील व्हिडिओंना सोशल मिडियावर ‘पसंती’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपूर्वी किंवा गेल्या वर्षा दोन वर्षात नेते काय बोलले आणि आता काय करीत आहेत, यातील विरोधाभास दर्शविणाऱ्या व्हिडिओंची सध्या सोशल मिडियावर चलती सुरु झाली आहे. नेत्यांनी पक्ष सोडला की त्यांचे दुखावलेले कार्यकर्ते याच नेत्यांने पूर्वी काय म्हटले होते, याचे व्हिडिओ, बातम्या शोधून त्या सोशल मिडियावर टाकू लागले असून नेटकरी त्याचा आंनद घेत आहे.

सध्या पूर्वश्रमीचे भाजपावासी आणि वंचित बहुजन आघाडीमार्फत लोकसभेत मुलुख मैदान म्हणून गाजलेले गोपीचंद पडळकर यांच्या भाषणाच्या विविध व्हिडिओ चांगल्याच गाजत आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘‘माझी आई जरी भाजपकडून उभी राहिली तरी मत देऊ नका, बिरोबाची शपथ आहे.’’ लोकसभा निवडणुकीत अशी भाषणे करणारे गोपीचंद पडळकर हे आता स्वत:च भाजपावासी झाले असून बारामतीमधून ते अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार आहेत.

याच पद्धतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपावर खूप टिका केली होती. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही टिका केली होती. तेव्हा त्यांनी ‘‘कोण मोदी ? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे.’’ असे म्हणत टिका केली होती. तेच तीन महिन्यात भाजपावासी झाले असून भाजपाच्या तिकीटवर पुन्हा लोकसभा निवडणुक लढवत आहेत.

तसेच अक्षय मुंदडा याचे ‘‘आईने सांगितलंय अक्षय राजकारण सोड पण पवार साहेबांना सोडू नको’’ हे वक्तत्व सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. अशा अनेक आयारामांचे पूर्वीचे व्हिडिओ नेटकाऱ्यांची करमणुक करत आहेत.

Visit : policenama.com