नेते दौऱ्यावर, सत्ता स्थापना वाऱ्यावरच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात निकाल लागल्यानंतर १० दिवस होऊन गेल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी कोणीही दावा केलेला नाही. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी नेत्यांची आता चढाओढ सुरु झाली असून सत्तेबाबत निर्णय घेणारे हे नेतेच दौऱ्यावर जात असल्याने सत्ता स्थापना आता वाऱ्यावरच राहिली असल्याचे चित्र दिसत आहे.

सत्ता स्थापनेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होऊन मार्ग निघण्याची गरज आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी झालेली नाहीत. इतर नेते खासगीत बोलणी करीत असले तरी त्याला फारसा अर्थ नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना भाजपाने शिवसेनेच्या ज्या अटी होत्या, त्या फेटाळल्या आहेत. त्यामुळे शिवसेना दुखावली गेली आहे. त्यामुळे त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. त्यातून चर्चेची दारे बंद झाली आहेत. या दोन नेत्यांची बोलणी झाली तरच मार्ग निघू शकतो. मात्र, आता हे दोन्ही नेते दौऱ्यावर जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा या पूर्वीच निश्चित झाला होता. त्याप्रमाणे ते आज औरंगाबादला जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेतली. त्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार रुपयांची घोषणा केली आहे. तेही आज अकोल्याच्या दौऱ्यावर जाणार असून पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.

सत्ता स्थापनेची चर्चा सुरु असतानाच शरद पवार यांनी शुक्रवारी नाशिकचा दौरा करुन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधायला सुरुवात केली. त्यामुळे आपण कोठे मागे पडू नये, म्हणून आता सर्वच नेत्यांनी आपापल्या भागात दौरे करायला सुरुवात केली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही नाशिक दौरा करुन शेतकऱ्यांची भेट घेतली. आमदार, खासदार हे बांधाबांधावर फिरुन फोटो काढून घेऊ लागले आहे. नेत्यांच्या या दौऱ्यामुळे आता सत्ता स्थापनेची चर्चा जवळपास थांबल्यासारखी झाली आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या