पुण्यातील एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा विनयभंग

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील एका महिला पोलीस कर्मचार्‍याचा तिच्याच नातेवाईकांकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना घरात राहण्यासाठी शारिरीक संबंध ठेवण्यास जबरदस्तीने मागणी करत मारहाण देखील केली आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय पिडीत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नातेवाईक दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला पोलीस शिपाई आहेत. येथील एका पोलीस ठाण्यात नेमणूकीस असून, राहण्यास वानवडी परिसरात आहेत. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरात राहण्याच्या कारणावरून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर फिर्यादींच्या घरी येऊन त्यांना हाताने मारहाण केली. यावेळी त्यांना शिवीगाळकरून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्यांनी पोलीसांत तक्रार करते असे म्हटल्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.