योगमुद्रासन केल्यानं दूर होतात पोटाचे आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत. केवळ हे उपचार कसे करावेत याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. आयुर्वेद, योगाभ्यास असे विविध पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. याच माध्यमातून आपण आजार बरे करू कशतो. गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा सारख्या आजारांवरदेखील योग लाभदायक ठरतो. हे आजार दूर करण्यासाठी दररोज योगमुद्रासन केल्यास चांगला आराम पडतो.

असे करा योगमुद्रासन
आसनावर पद्मासन घालून बसा. दोन्ही हातांचे मनगट पाठीच्या मागील बाजूस पडून ठेवा. त्यानंतर डोके हळूहळू उजव्या हाताकडे वळवून गुडघ्याकडे घेऊन जा. काही काळानंतर पूर्वस्थितीमध्ये या. आता हीच प्रक्रिया डाव्या बाजूच्या गुडघ्याकडे करा. त्यानंतर डोके सरळ ठेवून स्वतःसमोर जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. थोडावेळ अशाच स्थितीमध्ये राहा. त्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या.

हे लाभ होतील
यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित आजार दूर होतात. रक्तविकार नाहीसे होतात. हृदय मजबूत होते. पोटावरची चरबी नष्ट होते. मानसिक शक्ती वाढते. शरीर मजबूत होते. गॅस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता या आजारांवर हे आसन लाभदायक आहे.

फेसबुक पेज लाईक करा –