आवळा खाण्याचे ‘हे’ आहेत 7 आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय आवळ्यात इतरही अनेक औषधी गुणधर्म असल्याने ते एक आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असल्याने पांढर्‍या रक्त पेशींचे प्रमाण वाढते. आपली रोगप्रतिकारशक्ती याच पेशींवर अवलंबून असते. आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका आहे. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो. आवळ्याचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 शरीर शुद्ध होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

2 शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

3 आवळा पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही उपयुक्त आहे.

4 भरपूर कॅल्शियम असल्याने आवळा सेवन केल्यास हाडे मजबूत होतात. ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांच्या समस्यांमध्ये अराम मिळतो.

5 डोळ्यांना फायदा होतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस इत्यादी आजार दूर होतात.

6 मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होतात आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते.

7 यातील औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे हृदय तंदुरुस्त राहते. खराब कोलेस्ट्रॉल कमी होतात.