जाणून घ्या, कशी बनली एक बुलेट या लोकांसाठी देव आणि त्यांनी पूजाच चालू केली

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या झाडाची किंवा विशिष्ठ आकाराच्या मूर्तीची पूजा करताना तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल. मात्र राजस्थानमधील जोधपूर येथे लोक चक्क एका दुचाकी बुलेटची पूजा करतात. या बुलेटसाठी एक मंदिरही बांधण्यात आले आहे आणि लोक मनोभावे मंदिरात येऊन बुलेटची पूजा करतात.

या बुलेटची कहाणीदेखील मोठी अजिब आहे. हायवेवरून जाताना रोहत नावाच्या ठिकाणी ओम बन्नाचे मंदिर दिसेल त्याच्या मागे RNJ7773 नंबरची बुलेट दुचाकी उभी दिसेल. लोक या गाडीची पूजा देखील करतात ही गाडी ओम बन्ना यांची असल्याचे समजते. ओम बन्ना यांचा याच रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला होता आणि त्यावेळी त्यांची बुलेट पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये ओढून नेली होती.

त्यानंतर अनेक लोकांचे म्हणणे होते की, रात्री अचानक ही बुलेट सुरु व्हायची आणि अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जायची. शेवटी पोलिसांनी वैतागून ती गाडी भंगारवाल्याला विकून टाकली मात्र थेथूनाही ही गाडी सुरु होऊन अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन थांबायची.

त्यानंतर ओम बन्ना यांच्या आजीला एक स्वप्न पडले त्यानंतर त्यांनी ओम बन्नाचे एक छोटे स्मारक केले. त्यानंतर लोक तिथे येऊन पूजा करू लागले. अनेक जण सांगतात की याठिकाणी येऊन अनेक इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे पूर्ण श्रद्धने लोक या ठिकाणी येऊन प्रार्थना करतात असे दशरथ सिंह सांगतात.

आता या मंदिराची देखभाल ओम बन्नाचे घरचेच लोक करतात. २ डिसेंबर १९८८ साली चोटीला गावचे ओम बन्ना इथून जात होते. तेव्हा त्यांची मोटारसायकल एका दरीमध्ये पडली. तेव्हापासून ही मोटारसायकल आपोआप सुरु होऊ लागली. तेव्हा लोकांच्या मनात याबद्दल आस्था तयार झाली आणि पुढे मंदिरही उभे राहिले.

Visit : Policenama.com