Stay Home Stay Empowered : जाणून घ्या कोरोना लस कशी आणि कोणत्या वस्तूंपासून तयार होतेय

नवी दिल्ली : कोरोना व्हॅक्सीनची प्रतिक्षा सर्वजण करत आहेत, कारण ती आल्यानंतरच जग काही प्रमाणात पुन्हा सामान्य होऊ शकते. पण तुम्हाला माहित आहे का, कोरोना व्हॅक्सीन कोणकोणत्या पदार्थांपासून बनत आहे. अखेर असे काय आहे, जे कोरोना व्हायरसविरूद्ध तुमचे इम्यून तयार करू शकते. कोरोना व्हॅक्सीनमध्ये वापरण्यात येणार्‍या पदार्थांविषयी जाणून घेवूयात…

मॉडर्ना आणि फायजरची व्हॅक्सीन खुपच चर्चेत आहे. मॉडर्ना आणि फायजरने आपल्या कोविड-19 व्हॅक्सीनला संश्लेषित करताना एक असामान्य दृष्टिकोणाचा वापर केला आहे.

पारंपारिक व्हॅक्सीन आणि नव्या व्हॅक्सीनमध्ये फरक
पारंपारिक व्हॅक्सीनद्वारे आपल्या शरीराच्या रक्तप्रवाहात जिवंत किंवा मृत व्हायरस टाकला जातो. सोबतच यामध्ये अनेक पदार्थ असतात, जे प्रतिकारक प्रक्रिया निर्माण करण्यासाठी उपयोगी असतात. परंतु, कोरोनाच्या नवीन व्हॅक्सीनमध्ये मॅसेंजर आरएनएचा वापर करण्यात आला आहे, जे एक प्रकारचे न्यूक्लिक आम्ल आहे. यास एमआरएनए सुद्धा म्हणतात. हे मॅसेंजर आरएनए एक आनुवंशिक तंत्राचे संकेत देते, ज्यामुळे कोविड अँटीबॉडी उत्पन्न होते, जी व्हायरसच्या लक्षणांना नष्ट करते. म्हणजे या प्रक्रियेत व्हायरस शरीरात थेट इंजेक्ट केला जात नाही.

लवकर तयार झाली व्हॅक्सीन
मॅसेंजर आरएनएच्या नव्या तंत्राच्या वापरामुळे कोरोना व्हॅक्सीन लवकर तयार झाली आहे. अन्यथा पारंपारिक व्हॅक्सीन बनण्यासाठी अनेक वर्ष लागतात. तज्ज्ञांनुसार, सामान्य व्हॅक्सीन बनवण्यासाठी सामान्यपणे चार वर्ष लागतात, परंतु कोरोना व्हॅक्सीन एक वर्षापेक्षा कमी कालावधीत तयार झाली आहे. याचे एक कारण व्हॅक्सीनचे घटक सुद्धा आहे, कारण एमआरएन व्हॅक्सीनमध्ये पारंपारिक घटक नाहीत.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सीन नॉलेज प्रोजेक्टनुसार, व्हॅक्सीनमध्ये हे घटक असतात –

– अल्युमिनियम (टल्युमिनियम साल्ट जसे की अल्युमिनियम सल्फेट, फॉस्फेट किंवा पोटॅशियम अल्युमिनियम सल्फेट)

– स्क्वालेन ऑईल (एमएफ 59- जे केवळ फ्लूच्या व्हॅक्सीनमध्ये वापरतात)

– थायमरसॉल (मर्करीचे एक विना हानिकारक उत्पादन, ज्याचा आता जास्त वापर होत नाही)

– जेलाटीन

– सोर्बिटोल

व्हॅक्सीनमध्ये याच घटकांचा वापर होतो, जे कंपनी आणि आजाराच्या हिशेबाने बदलतात. तर शास्त्रज्ञ लसीच्या निर्मितीत काही अन्य वस्तूंचाही वापर करतात, जसे की अंडे. अंडे लस तयार करण्यास मदत करते. एमआरएनए व्हॅक्सीनमध्ये अंडे किंवा इतर घटकांची आवश्यकता नसते, ज्यामुळे ती बनण्यास जास्त वेळ लागत नाही. मात्र, व्हॅक्सीन बनवणार्‍या कंपन्यांनी त्या घटकांबाबत पूर्ण माहिती दिलेली नाही, जे लसीत वापरले गेले आहेत.