जाणून घ्या DRDO नं बनवलेल्या कोरोना विरोधी 2DG औषधाचे दुष्परिणाम आणि दर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. बळींचे प्रमाण देखील अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोनावर 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज हे भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाने (DRDO) औषध शोधले आहे. तर 2-DG असे या औषधाचे नाव आहे. तसेच आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूवरील 2-DG हे पहिलेच औषध असून त्याची निर्मिती करण्यास DRDO च्या संशोधकांना आता यश आले आहे. 2-DG DRDO च्या विभक्त औषध आणि संबंधित विज्ञान संस्थाकडून (INMAS) विकसित करण्यात आले आहे. तर यामध्ये हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या संशोधकांचेही योगदान आहे. डॉ. रेड्डीज सामान्य लोकांसाठी हे औषध तयार करणार आहे. तरऔषध पावडरच्या स्वरूपात असणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान INMAS च्या वैज्ञानिकांनी यावर कमला प्रारंभ केला होता. तसेच २०२० च्या मे महिन्यात DCGI ने या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील टेस्टला देखील परवानगी दिली होती. ही टेस्ट ऑक्टोबरपर्यंत सुरु होती. २०२० च्या नोव्हेंबरमध्ये तिसऱ्या टप्प्याला परवानगी मिळाली. आता आपत्कालीन वापराला परवानगी दिली गेली आहे.

2-DG चे स्वरूप –
2-DG हे औषध 2-DG जी अणूचे बदललेले रुप आहे. जे ट्युमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचारासाठी वापरले जाते. टेस्टमध्ये 2-DG कोरोना रुग्णांवर परिणामकारक असल्याचे पुढे आले आहे. तर हे औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनवरील अवलंबित्व सुद्धा कमी करते.

कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिअंटला रोखणार?
विभक्त औषध आणि संबंधित विज्ञान संस्थाचे (INMAS) संचालक डॉ. अनिल मिश्रा म्हणतात, 2-DG हे औषध आपलीच कॉपी तयार करणाऱ्या विषाणूला पकडते. विषाणूच्या कोणताही व्हेरिअंट असुदे त्याला भूक लागते. ही भूक शांत करण्यासाठी तो पुढे येईल तेव्हा 2-DG औषध त्याला बंद करेल. तसेच, विषाणू गतीने वाढू लागल्याने रुग्णाला प्राणवायूची आवश्यकता भासते. परंतु, हे औषध विषाणूला वाढण्यापासून थांबवत असल्याने आपोआपच रुग्णाला प्राणवायूची आवश्यकता भासणार नाही.

2-DG चे किती डोस घ्यायचे ?
एका पाकिटात हा डोस मिळेल. कोरोना रुग्णाला ORS जसे पाण्यात मिसळतात आणि पितात तसेच प्यावे लागणार आहे. हे औषध दिवसामधून २ वेळा घ्यावे लागेल. कोरोना रुग्ण पूर्णपणे ठीक होण्यासाठी हे औषध ५ ते ७ दिवस प्यावे लागणार आहे. असे डॉ. सुधीर चंदना यांनी माहिती दिली आहे.

या डोसचा दर किती असणार?
दराबाबत आजूकाही जारी केलं नाही. त्याची किमंत आज जारी करण्यात येणार आहे. चंदना यांनी म्हटले की, या औषधाच्या दराचा निर्णय डॉ. रेड्डीज कंपनी घेणार आहे. परंतु, हे औषध परवडणारे असेल यावर लक्ष दिले जाईल. तर एका पाकिटाचा दर ५०० ते ६०० रुप्याच्या आसपास असणार आहे. असे सूत्रांकडून समजते.

2-DG चे दुष्परिणाम काय?
टेस्टदरम्यान, सामान्य कोरोनाबाधित आणि गंभीर रुग्णांवर याचा प्रयोग केला गेला आहे. परंतु, सगळ्या रुग्णांना याचा लाभ झाला आहे. सगळ्यामध्ये प्रतिकूल परिणाम दिसला आहे. 2-DG चा कोणताही दुष्परिणाम नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे सांगण्यात आले आहे.