सलग 3 दिवसांच्या इंधन दरवाढीनंतर सर्वसामान्यांना दिलासा, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात एकीकडे कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना दुसरीकडे महागाईचे चटके देखील सोसावे लागत आहे. इंधन दरात तीन दिवसापासून सातत्याने वाढ होत होती. मात्र गुरुवारी इंधन दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

पाच राज्यातील विधानसभा निवडणूका होताच तेल विपणन कंपन्यांनी १० दिवसाच्या तुलनेत सात दिवस इंधन दरात वाढ केली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रूड बाजारात बुधवारी वाढ झाली पण त्याचा परिणाम देशांतर्गत इंधनाच्या दरावर दिसला नाही.

पाच राज्यातील निवडणूक संपल्यानंतर २ मे पासून इंधन दरात सलग सात दिवस वाढ करण्यात आली. त्यामुळे पेट्रोल १.६८रुपयांनी तर डिझेल १.८८ रुपयांनी महागले. महत्त्वाचे म्हणजे मध्यप्रदेशमधील भोपाळ आणि अनुपपुर, राजस्थानमधील श्रीगंगानागर, महाराष्ट्रातील परभणी येथे पेट्रोल शंभरीच्या पुढे गेले.

काय आहे आजचे दर (किंमत प्रति लिटर)
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली ९२.५ ८२.६१
मुंबई ९८.३६ ८९.३६
चेन्नई ९३.८४ ८७.७५
कोलकत्ता ९२.१६ ८५.४५

तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर कसे कराल चेक?
क्रूड तेलाच्या किमती आणि परकीय चलनाच्या दरानुसार देशातील इंधन दर बदलत असतात. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता देशातील इंधन दर सुधारित होतात. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सुधारित दर सकाळी सहा वाजलेपसून लागू होतात.
दरम्यान, फोन वरूनही इंधनाचे सुधारित दर आपण जाणून घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.