क्रिकेटर दीपक चाहरनं केली ‘स्वप्नवत’ कामगिरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – जसप्रित बुमराहसह प्रमुख अस्त्र असलेले गोलंदाज नसताना मिळालेल्या संधीचे सोने करुन स्वप्नवत कामगिरी करणारा दीपक चाहर यांची आज सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. भारताकडून अवघा सातवा टी २० क्रिकेट सामना खेळणाऱ्या दीपक चाहर याने रविवारी रात्री एक विक्रम करुन टी २० मधील सर्वात चांगली कामगिरी नोंदविली.

दीपकने काल ३ षटके व २ चेडू टाकले. त्यात त्याने ७ धावा देऊन ६ गडी बाद केले. ही आंतरराष्ट्रीय टी २० मधील सर्वोकृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी श्रीलंकाचा अजंता मेंडिस याने २०१२ मध्ये ८ धावा देऊन ६ बळी घेतले होते. दीपक चाहर याने त्यापेक्षा सरस कामगिरी करताना हॅट्रीकही घेतली आहे. आग्रा येथील राहणारा दीपक लोकेंद्रसिंग चाहर याचा जन्म ७ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. तो उजव्या हाताने फलंदाजी व गोलंदाजी करतो. त्याचे वडिल इंडियन एअर फोर्समधून निवृत्त झाले आहेत. राहुल चाहर या चुलत भावामुळे दीपकला किक्रेटची गोडी लागली.

त्याने प्रथम श्रेणीच्या किक्रेटमध्ये जयपूर येथे रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध १० धावात ८गडी बाद केले होते. २०१० मध्ये तो राजस्थान रॉयलकडून खेळला होता. २०१८ मध्ये तो चेन्नई सुपर किंगकडून खेळला होता.

मे २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी २० संघात त्याची निवड झाली. ८ जुलै २०१९ मध्ये त्याचे आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पर्दापण झाले. या सामन्यात त्याने जसन राय याला बाद केले होते. कालच्या रविवारपूर्वी त्याने ६ टी २० इंटरनॅशनल सामने खेळले होते. त्यात त्याला ८ बळी मिळविण्यात यश आले होते. पण रविवारचा दिवस हा त्याचाच होता. त्याने तब्बल ७ धावात ६ बळी घेऊन स्वप्नवत कामगिरी केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like