आता ‘गंगा’ कोपली, चार धाम यात्रा स्थगित

शिमला : वृत्तसंस्था – दक्षिण, पश्चिम भारतात पावसाने कहर केल्यानंतर आता मॉन्सूनने आपला मोर्चा उत्तर भारताकडे वळविला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात सध्या मुसळधार पावसाचा प्रकोप दिसून येत आहे. पावसाने गेल्या ८ वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असून हा पाऊस २४ ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे चार धाम आणि हेमकुंडसाहिबा यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बारावीपर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हरिद्वार येथे गंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. हरिद्वार प्रशासनाने सर्वत्र अर्लट जारी केला आहे. शिमला येथे पावसाने मागील ८ वर्षाचे रेकॉर्ड तोडले. हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे २३ जणांचा मृत्यु झाला असून त्यात सर्वाधिक शिमला जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. राज्यातील सर्व ९ राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील पौडी, नैनीताल, डेहदाडून, चंपावत, उत्तर काशी, अल्मोडा, पिथौरागड, चमोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने येथे सुट्टी जाहीर केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like