#YogaDay 2019 : ‘योग’साधनेची सुरुवात करा वज्रासनाने, मिळवा ‘हे’ फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – योगसाधनेचा परिणाम केवळ शरीरावर न होता मनावर आणि भावनांवरही होतो. योगसाधना करताना बैठक पक्की करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यादृष्टीने ध्यानधारणेला उपयुक्त ‘वज्रासन’ महत्त्वाचं ठरतं.

वज्रासन म्हणजे काय –

वज्रासनात आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणूनच याला वज्रासन म्हणतात. वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र, व्रज म्हणजे जननेंद्रिय असे त्याचे अर्थ आहेत.

वज्रासन करण्याची पद्धत –

वज्रासन करण्यासाठी प्रथम दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत. डाव्या हातावर व बाजूवर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे. आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी.

पार्श्वभाग उलट्या पावलांवर व्यवस्थित पक्का करावा. ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत. डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे. हीच वज्रासनाची अंतिम स्थिती होय. अशा सुखकारक आसनामध्ये श्वासोच्छ्वास आपोआप शांत, सावकाश व दीर्घ होतो. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. हे आसन सोडताना डोळे उघडून तळहात मांड्यांवरून खाली जमिनीवर ठेवावेत. दोन्ही पाय एकेक करून सरळ करावेत.

वज्रासनाचे फायदे –

योगाभ्यासासाठी योग्य अशी शांत, एकाग्र, मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती वज्रासनामुळे लवकर साध्य होते. म्हणून सुरुवातीस हे आसन केल्यामुळे पुढील योगाभ्यास उत्तम होतो.
ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते.
जननेंद्रियांचे आरोग्य चांगले राहते.
पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात. ताठ बसण्याची सवय लागते.
वज्रासन हे रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि पचन संस्था नियंत्रित करण्यासाठी मदत करते.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन