जाणून घ्या ; कोण आहेत विखेंचे मेहुणे संभाजी झेंडे ?

मुंबई :  वृत्तसंस्था : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आता जोरदार झटका बसला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती आणि निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विखे-पाटलांना मोठा झटका बसला आहे.

राष्ट्रावादी काँग्रेसचा सासवड इथे शेतकरी मेळाव्यात संभाजी झेंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राजकारणात प्रवेश करतील. त्यामुळे आता विखे-पाटलांच्या मेहुण्याच्या हात काँग्रेसचा न दिसता त्यांच्या हातात राष्ट्रवादीचं घड्याळ पाहावयास मिळणार आहे.

राजकीय वर्तुळात सर्वांनाच शरद पवार आणि विखे कुटुंबाचे राजकीय संघर्ष माहित आहेत. त्यात विखेंच्याच मेहुण्यांनाच राष्ट्रवादीने गळाला लावल्याने दोघांचा हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

कोण आहेत संभाजी झेंडे?
संभाजी झेंडे यांची माहिती- 
1. 37 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर ते 30 एप्रिल 2017 मध्ये निवृत्त झाले.
2.  संभाजी झेंडे हे कर्तव्यदक्ष सनदी आधिकारी म्हणून ओळखले जात.
3. 1993 मध्ये ते पदोन्नतीने आयएएस झाले
4. दिवे घाटातील दिवे हे झेंडे कुटुंबाचं मूळ गाव. शेतकरी कुटुंबात 17 एप्रिल 1957 रोजी संभाजी झेंडे यांचा जन्म झाला
5. संभाजी झेंडे हे 5 जण भाऊ आहेत.
6. शालेय शिक्षण दिवे गावातच झालं, त्यानंतर त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी मिळवली.
7. MSC अग्री, LLB अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.
8. 1980 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेत पास होऊन, प्रशासकीय सेवेत रुजू झाले.
9. त्यांनी शासनाच्या विविध विभागात उल्लेखनीय काम केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us