Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – शिकाऊ वाहन परवाना (Learning licenses) मिळवण्यासाठी आता (RTO) कार्यालयात जाण्याची गरज नाही. घर बसल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी चाचणी तसेच नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकाकडून ऑनलाईन (online ) पद्धतीने करण्यासाठी परिवहन विभागातर्फे सारथी 4.0 अंतर्गत तयार केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांच्या हस्ते सोमवारी (दि. 14) करण्यात आले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

वाहन नोंदणी जलद अन् सोयीस्कर
शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. यामुळे आता शिकाऊ वाहनचालक परवाना (Learning licenses online), तसेच नवीन वाहनांची नोंदणी अधिक जलद व सोयीस्कर होणार आहे. भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

खर्चात बचत, कामाचा ताणही कमी
राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने दिले जातात. तसेच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे 100 कोटींचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ अन् श्रमही वाचणार आहे. तसेच हे काम करणाऱ्या अंदाजे 200 अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

वाहन वितरकांनी कर अन् शुल्क भरताच वाहन क्रमांक जारी
नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत केली जात होती. आता अशा पध्दतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकली आहे. यापुढे नवीन वाहनांच्या वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई स्वाक्षरी पद्धतीने तयार केले जाईल. त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : learning licenses and registration of new vehicles will be online in maharashtra

हे देखील वाचा

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार