मधुमेही रूग्णांनी नियमित रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मधुमेहाच्या तीन रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. टाइप १ मधुमेह असलेल्या सुमारे २५% आणि टाइप २ मधुमेह असलेल्या ८०% लोकांना उच्च रक्तदाब असतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणे हे अधिक धोकादायक आहे. अशा रूग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदाब आणि मधुमेह या दोघांना एकत्रितपणे अतितीव्र आजार म्हणूनही ओळखले जाते.

उच्च रक्तदाब तसेच मधुमेहापासून होणारा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल केले पाहिजेत. निरोगी जीवनशैलीने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. यासाठी व्यायाम आणि कमी चरबीयुक्त आहार, जेवणात मिठाचे कमी प्रमाण याचा समावेश केला पाहिजे. मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून १९८० आणि २०१४ मध्ये भारतीय पुरुषांमधील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण ३.७ टक्के – ९. १ टक्के आणि २४.५ टक्के – २६.६ टक्के वाढले आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे ४.६ टक्के – ८.३ टक्के तर २२.७ टक्के – २४.७ वाढले आहे. मधुमेहींना हदयरोग, किडनी विकार, स्ट्रोक हे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. मधुमेहींना रक्तदाबाची समस्या असल्यास अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता अधिक असते.

सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० असावा आणि डायस्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४०च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब असतो. मधुमेह असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. भारतामध्ये मधुमेहाचे प्रमाण ६.१ टक्के आणि पुरुषांमध्ये ६.५ टक्के आहे. उच्चरक्तदाबाचे प्रमाण महिलांमध्ये २० टक्के आणि पुरुषांमध्ये २४.५ टक्के आहे. महिलांमध्ये २० टक्के आणि पुरुषांमध्ये २४.५ टक्के प्रमाणात उच्चरक्तदाबाचे प्रमाण दिसून येते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.