जळगाव : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ट्रक-क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 10 जण ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- ट्रक आणि क्रुजरमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात 10 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर झाला आहे. हे सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातचे वृत्त समजताच पोलीस आणि अन्य लोक घटनास्थळी दाखल झाले होते.

रविवारी मध्यरात्री बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर ट्रक आणि क्रूजरचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त क्रुझरमधील प्रवासी चोपडा येथून स्वागत समारंभ आटोपून येत असताना रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. अपघातात क्रूजर जीपमधील 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच नाशिकमधील देवळा येथे एसटी बस आणि आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली झाली होती. या अपघातात एसटीने रिक्षाला काही अंतर फरफटत नेले आणि एका विहिरीत रिक्षा कोसळली आणि त्यानंतर एसटीसुद्धा त्याच विहिरीत कोसळली होती. या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघातातील मृतांची संख्या आता 25वर गेली होती. तर 34 जण जखमी होते.

अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे निघाली होती. बस आणि रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले होते. मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत आणि जखमी प्रवाशांचा उपचाराचा खर्च एस टी महामंडळाने करण्याचे जाहीर केले होते. या अपघातानंतर हा आणखी एक मोठा अपघात झाला आहे.