बायकोचा खून करण्यासाठी सुट्टी हवीय…! बँक कर्मचाऱ्याचा मोदींना अर्ज

पाटणा : वृत्तसंस्था – गावी जाण्यासाठी, कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी किंवा आजारी असल्यावर सुट्टीचा अर्ज केलेला तुम्ही अनेकदा ऐकले आणि पहिले असेल पण बिहार मधील एका बँक कर्मचाऱ्याच्या सुट्टीच्या अर्जाचे कारण वाचल्यावर तुम्हीसुद्धा आश्चर्य वाटेल. या बँक कर्मचाऱ्याने चक्क बायकोचा खून करून तिच्यावर अंत्यंसस्कार करण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मानवाधकार आयोगाला पत्र लिहून सुट्टी मागितली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहारच्या एका ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या मुन्ना प्रसाद यांनी हा अर्ज केला होता. बायको आजारी असल्याने तिच्यावर उपचारासाठी त्याला सुट्टी मिळत नव्हती. शेवटी त्याने असा अर्ज करण्याचा मार्ग निवडला. बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या असे त्याने रजा अर्जावर म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या रजा अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या या बँक कर्मचाऱ्याच्या सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने सुट्टीचे विचित्रच कारण लिहिलेलं दिसत आहे. दरम्यान, सुट्टी पूर्ण संपल्यानंतर मुन्ना प्रसाद पुन्हा बँकेत कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र, त्यांच्या या रजा अर्जामुळे बँकेतही ते चांगलेच चर्चेत आले होते.
You might also like