‘या’ विहिरीत पाण्याऐवजी मिळतंय ‘LED’ टीव्ही आणि ‘कॅमेरा’ ! लोकांची तर ‘लाईन’च लागली

वी दिल्ली : वृत्तसंस्था – विहिरीत जमिनीतील पाण्याच्या स्त्रोतातून पाणी जमा होते आणि त्या पाण्याचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. परंतू मध्यप्रदेशात अशी एक विहीर आहे ज्या विहिरीतून पाणी नाही तर एलईडी टीव्ही, कॅमेरा आणि आधार कार्ड बाहेर काढण्यात आले.

हे वाचून तुम्हाला देखील धक्का बसला असेल परंतू हे खरंच झाले आहे. मध्यप्रदेशात एक विहीर आहे ज्यातून एलईडी टीव्ही, कॅमरा आणि आधार कार्ड मिळाल्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. ते पाहण्यासाठी लोकांनी या विहिरीवर मोठी गर्दी केली आहे.

पोलिसांना तपास करताना जेव्हा एका विहिरीचा तपास केला तेव्हा त्यात अनेक बँग्स होत्या ज्यात एलईडी टीव्ही, कॅमेरा, आधार कार्ड सह इतर इलेक्ट्रॉनिक सामान उपलब्ध होते. पोलिसांना चोरी करणाऱ्या टोळीतील एक चोराला पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत चोराने अनेक खुलासे केले आणि सांगितले की चोरी केलेले काही सामान जे त्यांच्या उपयोगाचे नाही ते त्यांनी विहिरीत फेकले आहे.

चोरांने सांगितल्याप्रमाणे जेव्हा पोलिसांना या विहिरीची शोध घेऊन तपास केला तेव्ह त्यातून अनेक इलेक्ट्रॉनिक सामान बाहेर काढण्यात आले आणि हे पाहण्यासाठी तेथे गर्दी देखील झाली. पोलिसांनी दुसऱ्या काही वस्तू देखील ताब्यात घेतल्या आहेत. चोरांनी पैसे आणि ज्वेलरी सोडून बाकी सर्व विहिरीत फेकून दिले होते.

Visit : Policenama.com