‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त

नवी दिल्ली : पोलीसनामा – आपल्या घरातील टीव्ही मोठा असावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते . तो घरात येण्यासाठी सर्वसामान्य लोकही खूप खटाटोप करत असतात. या सर्वासामान्यांसाठी गुड न्यूज आहे. शाओमीने आपल्या एमआय एलईडी टीव्ही ४ प्रो ५५ इंचाच्या किंमतीत कमालीची कपात केली आहे. या टिव्हीच्या किंमतीत ७००० रुपयांची कपात ही कायमस्वरुपी आहे. या टीव्हीच्या मूळ किंमतीत कपात केल्यानंतर हा टीव्ही ४७,९९९ रुपये झाली आहे.

शाओमीचा टीव्ही भारतात लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच सवलतीच्या दरात उपलब्ध करून देत आहेत. शाओमी लवकरच एक नवीन एलईडी टीव्ही लाँच करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे आणि म्हणूनच कंपनीने जुन्या एलईडी टीव्हीची किंमत कमी करण्यात आली असावी.

दरम्यान, शाओमीच्या या टीव्हीची खासियत म्हणजे यातील बेजल्स असून नसल्यासारखे आहेत. हा टीव्ही ४ के डिस्प्लेसह येतो. शाओमीने या डिस्प्लेला ‘फ्रेमलेस डिस्प्ले’ असे नाव दिले आहे. शाओमीच्या या टीव्हीत डिस्प्ले विश्वातील आकाराने सर्वात लहान डिस्प्ले आहे आणि टीव्हीच्या कॉर्नरची साइझ फक्त ४.९ एमएम आहे.

एमआय एलईडी टीव्ही ४ प्रो ५५ ची वैशिष्ट्ये

१. क्वॉडकोर अॅम्लोजिक कॉर्टेक्स ए ५३ चिपसेट
२. ग्राफिक्ससाठी एमएएलआय ४५० एमपी ग्राफिक्स प्रोसेसर
३. २ जीबी रॅमसह ८ जीबी इंटरनल स्टोरेज
४. व्हॉइस सर्चसाठी गुगल असिस्टंट
५. अँड्रॉईड टीव्ही सह पॅचवॉल
६. उत्तम आवाजासाठी ८ वॅटच्या स्पीकरसह डॉल्बी ऑडियो
७.  ३८४० X २१६० पिक्सलसह ५५ इंचाचा डिस्प्ले
८. व्यूइंग अँगल १७८ डिग्री, यामुळे घराच्या कोणत्याही कोपऱ्यातून टीव्ही पाहता येणार
९. कनेक्टिव्हिटीसाठी २.० युएसबी पोर्ट
१०. एचडीएमआय पोर्ट यात एक ईथरनेट पोर्ट, एक एवी पोर्ट, एक S/PDIF पोर्ट उपलब्ध
११. ब्लूटुथ ४.२ आणि वायफाय कनेक्टिविटी सपोर्ट