JNU मधील हल्ल्यामागे ‘लेफ्ट टेरर डाऊन डाऊन’ ग्रुप ? हिंसाचारापूर्वी फिरत होते ‘मेसेज’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हिंसाचाराआधी देशद्रोह्यांना झोडून काढा असे मेसेज काही व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर फिरत होते. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जेएनयुमध्ये हिंसाचार झाला. त्यामुळे या हिंसाचारामध्ये एखाद्या व्हॉटसअप ग्रुपचा सहभाग असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच ‘लेफ्ट टेरर डाऊन डाऊन’ हा ग्रुप या हल्ल्यामागे आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

हिंसाचारासाठी चिथावणी देणारे मेसेज करणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्यात आल्यानंतर ज्यांनी हे हिंसाचाराचे आवाहन केले. त्यापैकी तिघांनी आपल्या मोबाईलचा गैरवापर झाल्याचा दावा केला आहे. तर एकाने आपला मोबाईल मित्राने घेतला होता, असे सांगितले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य असलेल्या एकाने एकदा आरपार करण्याची गरज आहे. त्यांना आता मारणार नाही, तर कधी मारणार असा मेसेज केला होता. तो जेएनयुमध्ये पीएचडीचा विद्यार्थी आहे.

‘लेफ्ट टेरर डाऊन डाऊन’ नावाच्या एका व्हॉटस अ‍ॅप गु्रपवर या हल्ल्यानंतर एकाने आम्हाला जेएनयुमध्ये खूप मजा आली. त्या देशद्रोह्यांना मारुन आनंद झाला असा मेसेज केला होता. आपला हा मेसेज आपल्यावरच उलटण्याची शक्यता लक्षात आल्यावर त्याने आम्ही मस्करी करीत असल्याचा बचाव केला आहे.

‘युनिटी अगेस्ट लेफ्ट’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील सदस्यांपैकी एकाने कॅम्पसमधील हिंसाचार संपविण्यासाठी या ग्रुपमध्ये सहभागी झाल्याचे सांगितले आहे. एकाने या गु्रपचे नाव बदलून संघी गुन्स मुर्दाबाद असे ठेवून त्याने हा ग्रुप सोडून दिला असल्याचे आढळून आले. वेगवेगळ्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील मेसेज व त्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपची नावे पाहिली असता जेएनयुवरील डाव्यांचे वर्चस्व दूर करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/