‘गटबाजी’त बरबाद झालं ‘या’ सुप्रसिद्ध गायकाचं करिअर, सुशांतच्या निधनावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. या घटनेनंतर गटबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. विवेक ओबेरॉयनं ट्विट करत आपलं दु:ख मांडलं. दबंचे डायरेक्टर अभिनव कश्यप यांनी तर थेट सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर करिअर बरबाद केल्याचा आरोप केला आहे. या चर्चेतील एक कडी 70 च्या दशकासोबत जुळत आहे. हा किस्सा अशा लोकप्रिय गायकाचा आहे ज्यानं ऋषी कपूरचा पहिला सिनेमा बॉबीमधील सारी गाणी गायली होती. परंतु तोही इंडस्ट्रीतील याच राजकारणाचा शिकार झाला.

आम्ही ज्या गायकाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे शैलेंद्र सिंह. त्यांचा जन्म मुंबईत झाला, त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते पुणे फिल्म इंस्टिट्युटमध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले. पुण्यात अॅक्टींगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही सिनेमात कामही केलं आहे. रेखा यांच्या अँग्रीमेंट सिनेमात त्यांनी लिड रोल केला आहे. शैलेंद्र सिंह हे आपल्या मखमली आवाजाबद्दल ओळखले जातात. हा आवाज ओळखला तो म्हणजे शो मॅन राज कपूर यांनी.

एका जुन्या मुलाखतीत शैलेंद्र सिंह यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, पुण्यातून प्रत्येक वीकेंडला ते मुंबईत यायचे. राजश्री प्रॉडक्शनच्या एका व्यक्तीनं शैलेंद्रला राज कपूरला भेटवलं. यानंतर राज कपूर यांनी बॉबी सिनेमातील सर्व गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली. सिनेमा हिट आणि गाणी सुपरहिट झाली. शैलेंद्र सिंह रातोरात देशाचे नवीन सिंगिंग सेंसेशन बनले. ऋषी कपूरचा पुढचा सिनेमा खेल खेल मध्येही गाणं गायलं. हमने तुमको देखा हे गाणं बॉबीहून जास्त हिट झालं. याच फेमनं शैलेंद्र सिंहच्या करिअरला नजर लावली.

शैलेंद्र सिंह यांना करिअरमध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी, राम लक्ष्मण अशा अनेक संगीतकारांची खूप साथ मिळाली. शैलेंद्र सिंह कोणाचं नाव घेत नाही परंतु ते सांगतात की, हळू हळू त्यांची गाणी किशोर कुमारकडे जाऊ लागली. यात त्यांची मदत करत होते संगीतकार आर डी बर्मन. हे सगळीकडे बोललं जाऊ लागलं. यानंतर ऋषी कपूर यांच्यावरील सागर सिनेमातील जाने दो ना हे गाणं गाण्याची संधी शैलेंद्र यांना मिळाली. सिनेमाचे संगीतकार आरडी बर्मन होते.

सुशांत सिंहच्या निधनावर दु:खी झालेले शैलेंद्र सिंह म्हणाले की, “इंडस्ट्रीत हे सुरुवातीपासून आहे. याचा उपाय आत्महत्या करणं नाही. इथं आलेल्या व्यक्तीला आपल्या फिल्डमध्ये आणि खासगी आयुष्यातही खूप लढावं लागतं.”