बॅटिंगमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडविणार्‍या ‘या’ एकमेव क्रिकेटरचा फोटो नोटावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणारे फलंदाज आपण पाहता असतो. निवृत्तीनंतर त्यांचे नाव मैदानाला किंवा दोन देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेला दिले जाते. मात्र एक असाही खेळाडू आहे, ज्याचे नाव चक्क चलनी नोटांवर छापले जाते. आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्यांनी विंडीजला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिलेला आहे.

क्रिकेटमध्ये ते ज्या प्रकारचे खेळाडू होते, मैदानाबाहेर देखील ते तितकेच दिलदार माणूस होते. या त्यांच्या कामगिरीमुळेच त्यांचा फोटो चलनी नोटांवर छापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फ्रैंक वॉरेल या क्रिकेटपटूचा फोटो चलनी नोटांवर छापण्याचा निर्णय बार्बाडोस सरकारने घेतला होता. त्याचबरोबर त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट देखील काढले होते.

क्रिकेटमधील आपल्या खेळाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात देखील ते उमद्या मनाचे व्यक्ती होते. १९६२ मध्ये भारतीय संघ विंडीजच्या दौऱ्यावर गेला असताना एका सामन्यात भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांना दुखापत झाली असता त्यांना उपचारासाठी रक्त लागले असता त्यांनी कोणताही विचार न करता रक्तदान केले होते. त्यांच्या याच कार्याला सलाम म्हणून त्यांचा फोटो चलनी नोटयांवर वापरला गेला.

दरम्यान, फ्रैंक वॉरेल यांचे वयाच्या ४२ वर्षीच निधन झाले. जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचे स्थान तितकेच महत्वाचे आहे, जितके माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी यांचे भारतीय राजकारणात स्थान आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष देखील अटलबिहारी वाजपेयी यांचा विरोधी पक्ष देखील आदर करत होते त्याप्रमाणे फ्रैंक वॉरेल यांचा देखील विरोधी संघात आदर होता.

You might also like