Legislative Council By-Election | विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव बिनविरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Legislative Council By-Election | महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणुकीचं (Legislative Council By-Election) बिगुल वाजलं आहे. तर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागून होतं. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून (Congress) प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. दरम्यान, प्रज्ञा सातव या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

 

प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच त्यांच्या विरोधात भाजपचे (BJP) उमेदवार संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र संजय केणेकर यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून (Legislative Council By-Election) आल्या आहेत. विजयी झाल्याबद्दल काॅग्रसचे नेते आणि महसुूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सातव यांचं अभिनंदन केलं.

 

 

‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ व विरोधी पक्ष भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली त्याबद्दल त्यांचे आभार. असं थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- Legislative Council By-Election | pradnya satav wife of late congress leader rajiv satav won the election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा