विधान परिषद पोटनिवडणूकीची तारिख जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

विधान परिषदेच्या एका जागेसाठी ३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विदर्भातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी भाजपमधील इच्छूकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’04ed65fa-b59d-11e8-8baa-1d49bf2fd101′]

विधान परिषदेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी १४ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २४ सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २६ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तीन ऑक्टोबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल असा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभेत सध्या भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cead77d-b59d-11e8-af81-5d213a457b71′]

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांकडून परिषदेवर निवडून द्यायच्या जागेवर फुंडकर निवडून गेले होते. ३१ मे २०१८ रोजी त्यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत निधन झाले. फुंडकर यांच्या परिषद सदस्यत्वाची मुदत २४ एप्रिल २०२० पर्यंत आहे. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ह्या जागी पोटनिवडणूक होत आहे. फुंडकर ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांच्या जागेवर विदर्भातील ग्रामीण भागातूनच उमेदवार द्यावा, असा भाजपमध्ये एक मतप्रवाह आहे. तर आगामी निवडणुका पाहता शहरी भागातील कार्यकत्र्याला संधी द्यावी, असे काहींचे म्हणणे आहे.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक
https://t.me/policenamanews