Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Legislative Council Elections | राज्यातील विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचं (Legislative Council Elections) बिगुल वाजल्याने अनेक पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र, काही जिल्ह्यात आता निवडणूक बिनविरोध होताना दिसत आहे. कोल्हापूरातून काँग्रेसकडून (Congress) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे (BJP) माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (शुक्रवारी) महाडिक यांनी अर्ज माघारी घेतल्याने सतेज पाटील यांचा विधान परिषदेवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

 

आज (शुक्रवारी) भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज अमित शहा यांनी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना फोन करून अमल महाडिक (Amal Mahadik) यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना दिली. यानंतर महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचं ठरवलं. (Legislative Council Elections)

दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक यांनी अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी अखेर सतेज पाटील (Satej Patil) यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे.

 

Web Title :- Legislative Council Elections | legislative council election congress leader and minister satej patil unopposed in kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

अवघ्या 22 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा 82 kmpl मायलेजची Bajaj Discover 125, वाचा सविस्तर

Pune Crime | कौटुंबीक वादातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

Pune Crime | अल्पवयीन मुलीशी मैत्रीचे नाटक ! 5 वर्षांपासून कुटुंबाला दहशतीखाली ठेवणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल; हडपसर परिसरातील घटना

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण