Legislative Council elections | विधानपरिषदेसाठी शौमिका महाडिक यांचं नांव निश्‍चित? चंद्रकांत पाटील करणार घोषणा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Legislative Council elections | महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचं (Legislative Council elections) बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षाने आपली कंबर कसली आहे. तर या निवडणुकीसाठी कोल्हापूरहून भाजपकडून (BJP) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांचं नांव निश्‍चित करण्यात आलंय. 13 ऑक्टोबर रोजी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या नावावर शिकामोर्तब केल्याचे समजते.

 

विधानपरिषदेच्या (Legislative Council elections) सहा जागेचा कालावधी संपुष्टात येत आहे. यासाठी नव्याने 6 जागेवर निवडणूक जाहीर करण्यात आले आहे.
तसेच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे.
दरम्यान भाजपकडून (BJP) उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
त्यातच दोन दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (Rahul Awade), माजी आमदार सुरेश हाळवणकर
(Suresh Halvankar), प्रा. जयंत पाटील (Prof. Jayant Patil), भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या नावाची चर्चा होती.

दरम्यान, उमेदवारीसाठी राहुल आवाडे (Rahul Awade) हेही आग्रही आहेत.
आमदार आवाडे यांनीही आपल्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याची ग्वाही भाजपच्या नेतृत्त्वाला दिलीय.
त्यामुळे आवाडे की महाडिक याविषयीची उत्सुकता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
तर, चंद्रकांत पाटील यांनी शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली.
या भेटीनंतरच सौ. शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
मात्र, त्याचं नांव निश्‍चित (Legislative Council elections) असल्याची चर्चा आहे.

 

Web Title : Legislative Council elections | shaumika mahadik name to be announced chandrakant patil at kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rupali Chakankar | बालविवाह झाल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांचे पद रद्द करा ! राज्य महिला आयोगाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (व्हिडिओ)

RBI ATM Rules | तुम्ही सुद्धा मृत कुटुंबियाच्या खात्यातून किंवा ATM मधून पैसे काढत आहात का? मग जाणून घ्या परिणाम

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ तारखेला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, इथं चेक करा स्टेटस