गौरवास्पद ! पुण्याच्या मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुण्याचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदाचा पदभार स्विकारला आहे. मनोज नरवणे हे लेफ्टनंट जनरल डी. अंबू यांची जागा घेणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे 31 डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत असून त्यांच्या नंतर लष्कर प्रमुख पदाच्या शर्यतीमध्ये मनोज नरवणे आहेत.

मनोज नरवणे यांचे शालेय आणि प्रारंभीचे लष्करी शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले. त्यांनी आपली चित्रकलेची आवड जोपासत असताना त्यांना लष्कर सेवेत भरती होण्याचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1980 मध्ये ते लष्करात दाखल झाले. त्यांनी जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे नेतृत्व केले. तसेच आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे इन्स्पेक्टर जनरल, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील जनरल ऑफिसर इन कमांडिंग, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख अशा अनेक पदांची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांततताकाळी आणि दहशतवादी कारवाया अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेण्यात आली. नरवणे यांना परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like