Lek Mazya Kaljachya | ‘लेक माझ्या काळजाच्या’ अल्बमला रसिकांचा मोठा प्रतिसाद, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्याकडून कौतुकाची थाप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Lek Mazya Kaljachya | सध्याच्या युगामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा डंका वाजवत आहेत. मुलींना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध करता यावे यासाठी सरकारकडून (Government) देखील अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. अशातच लेकीची महती सांगणारा ‘लेक माझ्या काळजाच्या’ (Lek Mazya Kaljachya) अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे. या अल्बमला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Senior Actor Girish Oak) यांनी ‘वा वा फारच सुंदर सुरेल गित’ अशा शब्दात कौतुक केले आहे. हा अल्बम संगीतकार हर्षित अभिराज (Composer Harshit Abhiraj) यांनी संगितबद्ध केला आहे.

 

‘लेक माझ्या काळजाच्या दावणीची खुट्टी ग

थोडी हळवी लाजरी अन् थोडीशी ती हट्टी ग’

 

असे या गिताचे बोल आहेत. या अल्बमची शब्दरचना कवी हनुमंत चांदगुडे (Hanumant Chandgude) यांनी केली आहे. तर हर्षित अभिराज यांनी याला संगितबद्ध केले आहे. या अल्बमचे पार्श्वगायन देखील हर्षित अभिराज याचे आहे. तर उदय गाडगीळ Uday Gadgil (उगम म्यूझिक-Ugam Music) यांची ही निर्मिती आहे. प्रत्येकाने आपल्या लेकीसाठी हा अल्बम एकदा जरुर ऐकावा असे आवाहन हर्षित अभिराज, उदय गाडगीळ, हनुमंत चांदगुडे यांनी केले आहे.

 

हा अल्बम

 

 

 

या लिंकवर ऐकायला व पाहता येणार आहे. ‘लेक माझ्या काळजाच्या’ (Lek Mazya Kaljachya) अल्बम रसिकांच्या भेटीला आल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक रसिकांनी या अल्बमला लाईक करताना कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

 

Web Title :- Lek Mazya Kaljachya | Fans respond to Lek Mazya Kaljachya album of Composer Harshit Abhiraj, compliments from veteran actor Girish Oak

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा