home page top 1

धक्कादायक… सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या सावकाराने रागाच्या भरात कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आज चंद्रपुरमध्ये घडली. यामध्ये मुलगा ३० तर पत्नी ६० टक्के भाजली आहे. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमध्ये सावकार देखील जखमी झाला आहे.

पीयूष हरिणखेडे आणि कल्पना हरिणखेडे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर खासगी सावकार जसबीर भाटीया उर्फ सोनू हा देखील या घटनेत जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमधील सहकारनगर मध्ये राहणारे हरिश्चंद्र हरिणखेडे हे शिक्षक आहेत. त्यांनी जसबीर भाटीया याच्याकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. यातील दोन लाख रुपयांची परतफेड त्यांनी केली आहे. उर्वरित रक्कम आज देण्याचे ठरले होते.

ते पैसे घेण्यासाठी आज जसबीर हरिणखेडे यांच्या घरी गेला. त्यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाली. तेव्हा जसबीरने आपल्या गाडीतून पेट्रोल काढून अचानक पियूष आणि कल्पना यांच्यावर टाकून पेटवून दिले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आरडाओरडा झाला. आरडाओरडा ऐकून बाजूचे लोक धावत आले. त्यांना दोघांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत जसबीरही किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान, जसबीर भाटीया हा अवैधरीत्या सावकारी करतो. पैसे देण्याचे कबूल केल्यानंतरही त्याने हा जीवघेणा केल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हरिणखेडे कुटुंबानं व्यक्त केलीय. या घटनेमुळं शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Loading...
You might also like