Lentils : या ४ कारणांमुळे रोज खा प्रोटीन रिच मसूर डाळ, कधीही करू नका मिस

नवी दिल्ली : मसूर डाळ भारतात खूप आवडीने खाल्ली जाते. ती प्लांट बेस्ड प्रोटीन (Plant Based Protein) चे समृद्ध स्त्रोत मानली जाते. व्हेजिटेरियन डाएट फॉलो करणारे अंडी, मांस आणि मासे खाऊ शकत नाहीत, त्यांच्या प्रोटीनची गरज मसूर डाळ पूर्ण करते. मसूर डाळीचे फायदे जाणून घेऊया (Health Benefits of Lentils).

मसूर डाळ खाण्याचे फायदे

१. पोटासाठी लाभदायक
मसूर डाळीमध्ये प्रीबायोटिक फायबर असते जे पचनास मदत करते आणि चांगल्या बॅक्टेरियाला देखील प्रोत्साहन देते जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी होतो.

२. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली
फोलेट हृदयाचे रक्षण करते, जे लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते. गरोदर महिलांच्या न जन्मलेल्या बाळाच्या विकासासाठी हे खूप महत्वाचे आहे. मसूर डाळीत फोलेट, आयर्न आणि व्हिटॅमिन बी १ भरपूर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची रिस्क कमी होते.

३. डायबिटीजमध्ये आराम
डायबिटीज रुग्णांनी रोज मसूर डाळ खावी. कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. यामध्ये फायबर मुबलक असल्याने पोट भरलेले वाटते. जास्त खाण्याची गरज नसते.

४. शरीराला मिळेल एनर्जी
दैनंदिन काम करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते, यासाठी आयर्नयुक्त पदार्थ खावे लागतात,
विशेषत: जेव्हा अ‍ॅनिमिया असतो. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते जे प्रामुख्याने लोहापासून तयार होते.
शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवणे हे त्याचे काम आहे.
शरीरातील आयर्नचे शोषण वाढवायचे असेल तर मसूर डाळीसह व्हिटॅमिन सी रिच फूड खा, यामध्ये टोमॅटो,
लिंबू आणि शिमला मिरचीचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात