पिंपरी : ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने चिखलीच्या नेवाळेवस्ती परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत पोलीस व वन खात्याला माहिती देण्यात आलेली आहे.

चिखलीच्या नेवाळे वस्ती भागात ऊसाच्या शेतात स्थानिक नागरिकांना बिबट्या सदृश प्राणी आढळला आहे. याबाबत पोलीस व वन्य विभागास कळविण्यात आले आहे. तसेच सदर ठिकाणी पोलीस खात्यातर्फे खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परिसरात गस्त वाढवली आहे. ‘तो’ प्राणी बिबट्याच असल्याबाबत अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.

काही दिवसांपूर्वी चऱ्होली भागात बिबट्या दिसल्याची चर्चा होती, तथापि तो बिबट्या नसून तरस असल्याचे सखोल पाहणीनंतर स्पष्ट झाले होते. मात्र चिखली परिसरात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Visit : policenama.com