वढू बुद्रुक मध्ये शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील जखनाई मळा याठिकाणी एका शेतकऱ्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली असून मनीष आनंदा शिवले असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथील जखनाई मळा येथील शेतकरी मनिष शिवले हे सायंकाळी साडेसात च्या सुमारास शेतातील कामे आटोपून घरी येत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला यावेळी मनिष यांनी आरडाओरडा करत घराजवळ धावत आले यावेळी आजूबाजूचे नागरिक धावून आले हल्ल्यात शिवले हे जखमी झाले असता शेजारील नागरिकांच्या मदतीने त्यांना कोरेगाव भीमा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला झाल्याने डोक्यावर, दंडावर तसेच हातावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचे दिसून आले, तर मनिष शिवले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले, गावामध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच गावातील अनेक ग्रामस्थांनी कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली, घटनेची माहिती मिळताच शिरूर वनविभागाचे वनपाल प्रवीण क्षीरसागर, संजय पावणे, वनमजूर हनुमंत कारकुड, आनंदा हरगुडे यांसह आदींनी कोरेगाव भिमा येथील रुग्णालयात धाव घेत पाहणी केली असून जखमी शेतकरी मनिष शिवले यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या, तर शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक सह आदी परिसरात वारंवार बिबट्याचे हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने येथील नागरिक देखील भयभीत झाले असून वनविभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.