बिबट्याचा हल्ल्यात ५ चितळ, ३ काळवीट आणि १ चौसिंग्या ठार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे पुण्यातील शहरी भागात माणसांवर बिबट्याचे हल्ले वाढले असताना आता नागपुरातील गोरेवाडा भागातील प्राणी संग्रहालयात एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्याला ठार केले आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान हा बिबट्या काटोल मार्गावर असलेल्या गोरेवाडा जंगलातून आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नागपुरातील गोरेवाडा केंद्र हे वनपरिक्षेत्रात येते. त्यामुळे बिबट्या वाघ अशा जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून या केंद्राला विद्युत तारेचे कुंपण देखील आहे. मात्र विशेष म्हणजे हे कुंपण तोडून या बिबट्याने प्राणी संग्रहालयात प्रवेश केला एव्हढेच नाही तर ५ चितळ, ३ काळवीट व एक चौसिंग्याला ठार केले आहे. वनविभाग या बिबट्याचा शोध घेत आहे.