पुण्यात भल्या सकाळी बिबट्याचा धुमाकूळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने ५ जणांवर हल्ला केला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या आवाजामुळे तो रेणूका माता मंदिरामागे एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल डक्टमध्ये पडला आहे.

केशवनगर भागात आज सकाळी एका बिबट्याने एका ७ वर्षाच्या मुलाला पकडले. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या आणखी तिघांना या बिबट्याने जखमी केले आहे. त्यानंतर ही बाती वाऱ्यासारखी पसरल्याने लोक रस्त्यावर आले. लोकांच्या कोलाहालाने बिबट्या बिथरुन गेला असून तो एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या डक्टमध्ये पडला आहे.

अखेर अडीच तासांनंतर बिबट्या जेरबंद 

ही माहिती समजताच वन विभागाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहचले असून परिसरात मोठी गर्दी झाली आहे.

दोन दिवसांपूर्वीही वारजे, एनडीए परिसरात बिबट्या पाहिल्याचे नागरिकांनी सांगितले होते. वन विभागाच्या लोकांनी परिसरात पाहणी केल्यावर तेथे तसा कोणताही प्राणी अथवा त्याच्या पावलांचे ठसे मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळीच मुंढव्यात बिबट्याने काही जणांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याने वारजे परिसरात दिसलेला बिबट्या हाच असावा का असे बोलले जात आहे.

व्हर्टिकल ओरीयाना या बिल्डिंगमधे बिबट़्या असून वनविभाग शोध घेत आहे.