प्रवाशाच्या बॅगेत सापडले बिबट्याचे बछडे

चेन्नई : वृत्तसंस्था – थायलँडमधून भारतात येणाऱ्या प्रवाश्याच्या बॅगेतून चक्क बिबट्याचा बछडा सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नईच्या अण्णा विमानतळावर ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रवासी काजा मोइनुद्दीन याला अटक करण्यात आली आहे.

थायलंडमधून काही प्रतिबंधित प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती गुप्तहेर खात्याला मिळाली होती. त्यावरून प्राण्यांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला जानेवारीत अटकही करण्यात आली होती. त्यानंतर मात्र चेन्नई विमानतळावर प्रत्येक प्रवाशावर करडी नजर ठेवण्यात येत होती. काजा मोइनुद्दीन हा प्रवासी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवत वेगाने बॅग घेऊन विमानताळातून बाहेर पळ काढात होता. तेव्हा त्याच्या या सर्व हलचाली संशयास्पदवाटल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून त्याची कसून चौकशी केली.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चौकशी करत असताना त्याच्या बॅगेतून प्राण्याचा आवाज येत होता. तेव्हा त्याची बॅग तपासण्यात आली. तर टॉवेलमध्ये गुंडाळलेला एक बछडा सापडला. त्याला खोलल्यावर बछडा भेदरलेल्या अवस्थेत होता. तो भुकेने व्याकूळ होऊन किंकाळ्या फोडत होता. तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दूध पाजून त्याला शांत केलं. नंतर त्या बछड्याला आणि काजा मोइनुद्दीनला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

दरम्यान, हा बछडा केवळ एक महिन्याचा आहे. शिवाय तो एक मादा आहे. सध्या चेन्नईतील वाइल्डलाइफ सेंटरमध्ये बछड्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वनविभागाने दिली आहे. तसंच काजा मोईनुद्दीनची चौकशी करण्यात येत आहे. त्याने माहिती दिली तर याप्रकरणी अधिक लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like