अहमदनगर : पाण्याच्या शोधात विहिरीत पडला बिबट्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, आंबी दुमाला येथे पशुवैद्यकीय संपत इथापे यांचे डाळिंबाचे शेत आहे. तेथूनच एक ओढा वाहत असून ओढ्यालगत त्यांच्या मालकीची विहीर आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पाण्याच्या शोधात या परिसरात आला असता विहरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ओढ्यालागत बबन ढेरंगे हे गायी चारत होते. त्यांना विहिरीतून गुरगुल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीतील आतल्या बाजूला कठड्यावर बिबट्या दिसला त्यांनी त्वरित ही माहिती डाळिंबात काम करणाऱ्या गेनुभाऊ नरवडे यांना दिली. त्यांनी जमिनीचे मालक इथापे यांना सांगितले. इथापे यांनी घटनेची माहिती वनविभागास दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/