बिबट्याने पाडला वासराचा ‘फडशा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खेड तालुक्यातील सांगुर्डी येथील काळेवस्तीच्या टेकडीवर अमृता कऱ्हे यांच्या धनगरवाड्यावर बिबट्याने वासरावर हल्ला करुन त्याचा फडशा पाडला. भर वस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगुर्डी गावात पिंजरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सांगुर्डी परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. गेल्या ४ वर्षांपासून बिबट्याने लोकवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ले करणे सुरु केले आहेत. काळेवस्तीतील धनगरवाड्यात अमृता कऱ्हे यांच्या वासरावर शनिवारी रात्री बिबट्याने हल्ला करुन त्याला ठार मारले. त्यानंतर गावकऱ्यांनी वन विभागाकडे धाव घेतली असून गावात पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.

वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी
एका बाजूला बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढला असतानाच नगर -कल्याण महामार्गावर रविवारी सायंकाळी वाहनाच्या धडकेने बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. पिंपळवंडी गावच्या हद्दीमध्ये वाळूंजवाडी येथील मुक्ताईदेवीच्या मंदिराजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका वाहनाने धडक दिली. त्यात बिबट्या जखमी झाला असून त्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात हलविण्यात आले आहे.

Visit : Policenama.com