Pune : कात्रज बोगद्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, मध्यरात्रीची घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कात्रज बोगद्याजवळ बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. एकीकडे प्रशासन प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेकविध कार्यक्रम करत असताना नागरिक त्याला जुमानत नसल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कात्रज बोगद्याजवळ पुण्याकडे येत असताना एक बिबट्या जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बिट मार्शल पोलीस नाईक ललित मोहिते, सुहास पवळे, रणजीत काटे यांनी बिबट्याला रस्त्याच्या बाजूला घेतले.

तसेच वनविभागाला याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी सनस हेही दाखल झाले. मात्र बिबट्याला डोक्याला धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, बेदरक वाहन चालकामुळे प्राण्यांचे प्राण जात आहेत. या घटना आधीही घडल्या आहेत. मात्र ते वाहन चालक सापडत नाहीत. किंवा तितक्या गंभीरतेणे त्याचा तपास केला जात नाही.