Video : विहीरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून जेरबंद

शिरुर : पोलीसनामा ऑनलाईन – येथे रविवारी दि. १४ रोजी भक्षाच्या प्रतिक्षेत असताना बिबट्या विहिरीत पडला. रात्रभर बिबट्याने पाईपला पकडून विहिरीत मुक्काम ठोकला. सकाळी वनविभाची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले.

रामदास काशिनाथ भालेकर यांची घराशेजारीच एक विहीर आहे. या विहिरीमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या पडल्याने सकाळी बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान बिबट्याला बसण्यासाठी एक लाकडी फळी सोडण्यात आली. त्यानंतर बिबट्याने त्यावर आधार घेतला रेसक्यूटिम सकाळी १० वाजेच्या दरम्यान घटनाटस्थळी दाखल झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहीरीत सोडला व पिंजऱ्यांवर बोरीची काटेरी फांदी ठेवली कारण बिबट्या पिंजऱ्यामध्ये घुसताना पिंजऱ्यावर उडी मारु नये. पिंजरा सोडल्यानंतर बिबट्याने पोहत येऊन पिंजऱ्यात घुसने पसंत केले आणि पिंजरा बंद केला व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शिरुर तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर येथुन वैद्यकिय अधिकारी डाॅ. अजय देशमुख व त्यांची संपुर्ण  रेसक्युटिम, वनरक्षक सविता चव्हाण, वनपाल चारुशिला काटे, वनकर्मचारी विठ्ठल भुजबळ व शिरुर रेसक्युटिम तसेच गावकऱ्यांची रेसक्युटिम तसेच ग्रामस्थांनी देखील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून माणिकडोह निवारण केंद्रात नेल्याची माहीती वनपाल चारुशिला काटे यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like