पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्ह्यतून बिबट्याचे कातडे घेऊन विक्री करण्यासाठी पुण्यात आलेल्याना दोघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून नरेंद्र नामदेव गुरव (वय ३९, रा. गावठाणवाडी, गांव आर्चिणे, ता. वैभववाडी जि. सिंधदुर्ग) आणि अजित अनंत मराठे (वय ३३ वर्षे, अनंत मराठे हाऊस नं. ३१८ अ, पिंपळवाडी घोणरी घौसरी कणकवली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम-१९२७ चे कलम २६(१) ३२ (जे) व ६५, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम- १९७२ चे कलम ९, ३९, ४०, ४२, ४३, ४४, ४८, ४८ए,४९, ४९ए, ४९बी, ४९सी, ५०, ५१, ५१ (१ ॥) ५२, ५८ए या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याना बिबटयाचे कातडे विक्रीकामी काही इसम उपवन परिसरातील भूकेंद्र बस स्टॉप किंवा उपवन तलावाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सध्या वेशातील दोन पथक तयार करण्यात आले. येऊर येथील भूकेंद्र बस स्टॉपजवळ दोन इसम यांचेकडे दोन कळ्या रंगाच्या बॅक असल्याचे आढळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यात बिबट्याचे कातडे आढळून आले. दोघांनी बिबट्याचे कातडे आरोपीनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील वैभववाडी येथून आणल्याची कबुली दिली आहे. ते हे कातडे कोनाला विक्री करणार होते. याचा तपास करण्यात येत आहे.
सहाय्यक वनसंरक्षक डी. एम. दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ वन अधिकारी सुजय कोळी, विकास कदम तसेच वनरक्षक संजय साबळे राजन खरात, सुशिल रॉय यांच्या पथकाने केली.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय