चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुरुखप बाहेर काढले

पिंपरी-चिंचवड | पोलीसनामा आॅनलाइन – गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर येथील परिसरात बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. दबा धरून बसलेला बिबट्या दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांना लक्ष करत आहेत. अश्यातच आता पुण्याच्या बेल्हेत बिबट्या विहिरीत पडला होता. त्याला बेशुद्ध करून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथक, बिबट निवारा केंद्र, वनविभाग आणि गावकऱ्यांना यश आले आहे.

#MeToo: हाऊसफूल-4 मध्ये नानांच्या जागी ‘या’ दोन अभिनेत्यांची चर्चा 

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7d047c9-cfbf-11e8-907c-bd16f2ad2439′]

विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल चार तास अथक प्रयत्न करून बाहेर काढले. यावेळी बिबट्याला बेशुद्ध करून वर घेण्यात आले. बचाव पथक,जुन्नर बिबट निवारा केंद्र, वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने हे बचावकार्य पार पडले. हे बचावकार्य कठीण होते. कारण ज्या विहिरीत बिबट्या पडला होता, ती आणखी एका विहिरीला जोडली गेली होती. दोन विहिरींना जोडणाऱ्या बोगद्यात हा बिबट्या जाऊन बसायचा, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f13142b-cfc0-11e8-a340-8b689169cadb’]

अखेर बिबट निवारा केंद्राचे डॉक्टर अजय देशमुख आणि महेंद्र ढोरे पिंजऱ्यात बसून विहिरीत उतरले. त्यांनी डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले आणि बिबट्याला पिंजऱ्यात घालून बाहेर काढले. ही मादी बिबट सुखरूप असून तीच्यावर जुन्नर बिबट निवारा केंद्रात उपचार सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.