10 बोकडांना ठार करणारी ‘ती’ अखेर पिंजऱ्यात जेरबंद !

टाकळी हाजी : पोलीसनाामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे 10 बोकड ठार आणि 9 बोकड जखमी करून 15 लाखांचं नुकसाना करणाऱ्या बिबट्या मादीला वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून जेरबंद केलं आहे. शिरूर तालुक्यातील विनायक नरवडे या शेतकऱ्यानं आय गोट फार्म उभारला आहे.

या फार्म हाऊसवरील सानेन प्रजातीच्या एका बोकडाची किंमत ही जवळपास एक ते अडीच लाखांपर्यंत आहे. या फार्म हाऊसमध्ये 100 ते 150 बोकडांचं पालन करण्यात आलं आहे. शुक्रवारी (दि 28) रात्रीच्या सुमारास बिबट्या मादी कंपाऊंड लगतच्या झाडावरून उडी मारून आत शिरली. या हल्ल्यात तिनं नर प्रजातीचे 10 बोकड ठार केले. तर 9 बोकड गंभीर जखमी झाले आहेत.

वाढ केलेल्या या 10 बोकडांची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचं नरवडे यांनी सांगितलं. वन विभागानं फार्म हाऊसच्या मागील बाजूस पिंजरा लावला होता. मंगळवारी (दि 1) या पिंजऱ्यात दीड ते दोन वर्षींची बिबट्या मादी अडकली. वन विभागानं या मादीला माणिकडोह (ता जुन्नर) येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केल्याची माहिती वनरक्षक ऋषीकेश लाड यांनी दिली आहे.