‘लेस्बियन’, ‘गे’, ‘बायसेक्शुअल’, ‘ट्रान्सजेंडर’ (LGBT) लोकांना लैंगिक संबंधांसंदर्भात ‘या’ आजारांचा जास्त धोका !

पोलीसनामा ऑनलाईन :सुप्रीम कोर्टानं 158 वर्ष जुनं आयपीसीमधील कलम 377 मधील तो भाग रद्द केला आहे ज्यात परस्पर संमतीनं अनैसर्गीक लैंगिक संबंध ठेवणं गुन्हा होता. गुन्हेगाराच्या चौकटीत उभं करणाऱ्या कलम 377 च्या त्या भागाला तर्कहिन ठरवलं आहे.

एलजीबीटीचा अर्थ काय ?

एलजीबीटीचा अर्थ लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रांसजेंडर असा होतो. समलिंगी त्याच पद्धतीनं जीवन जगतात जसं सामान्य माणसे जगतात. हेच कारण आहे की, विषमलिंगींमध्ये त्यांना ओळखणं अवघड होतं. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

1) लेस्बियन- समलैंगिक महिलेला लेस्बियन म्हटलं जातं. जी महिला लैँगिक दृष्ट्या आणि रोमँसच्या दृष्टीनं दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होते. अशा महिला दुसऱ्या महिलेच्या प्रेमात असतात आणि त्यांच्यासोबतच संबंध बनवायला त्यांना आवडतं. काही प्रकरणात तर त्यांना त्यांच्याशी लग्न करून आयुष्य घालवण्याची इच्छा असते.

2) गे- इंग्रजी शब्द गे चा मुळ अर्थ होतो प्रसन्नता. बहुत करून हा शब्द समलैंगिकसाठी वापरला जातो. तसं पाहिलं तर या दोन शब्दांमध्ये खूप अंतर आहे. समलैंगिक विशेषत: लैंगिकतेशी संबंधित आहे. जेव्हा कोणी म्हणतं की, तो गे आहे तर याचा अर्थ असा आहे की, तो आपल्या स्वत:च्या लिंगाप्रति आकर्षित आहे. याचा अर्थ असा नाही की, तो निश्चित पणे आपल्या लिंगाच्या व्यक्ती किंवा अशा प्रकारच्या कोणत्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत आहे.

3) बायसेक्शुअल- बायसेक्शुअल म्हणजे त्या महिला किंवा पुरुष असू शकतात ज्या दोन्ही प्रकारचे लिंग असणाऱ्या व्यक्तींसोबत संबंध ठेवतात. यातील पुरुष किंवा महिला दोन्ही सोबत शारीरिक, लैंगिक किंवा भावनिकरित्या आकर्षित होऊ शकतात.

4) ट्रान्सजेंडर- हा शब्द त्या व्यक्तींबद्दल वापरला जातो जे जन्मत: वेगळ्या लिंगात असतात आणि आतून मात्र वेगळ्याच लिंगाचं जीवन जगतात. परंतु जे लोक कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय पर्याय स्विकारत नाहीत किंवा ज्यांना आपली ओळख ट्रान्ससेक्शुअल असल्याचं जाहीर करावं वाटत नाही ते लोक स्वत:ला दोन्ही लिंगामधील दुवा किंवा लिंग बदलातील मध्य मानतात.

काय आहे कलम 377 ?

आयपीसीमधील कलम 377 नुसार, जर कोणी एखाद्या पुरुष महिला किंवा जनावरांसोबत निसर्गाच्या विरुद्ध संबंध बनवत असेल तर तो गुन्हा ठरेल. यासाठी जन्मठेप किंवा 10 वर्षांची कैद किंवा आर्थिक दंडही केला जाऊ शकतो.

एलजीबीटी लोकांना या समस्येचा अधिक धोका

रिसर्च केल्यानंतर पुढील गोष्टी समोर आल्या आहेत

-एलजीबीटी युवांमध्ये आत्महत्या करण्याची शक्यता 2 ते 3 पट अधिक असते.
– असे युवक बेघर होण्याची जास्त शक्यता असते.
– समलिंगी पुरुषांना एचआयव्ही आणि इतर एसटीडीचा धोका जास्त असतो.

– समलिंगी आणि बायसेक्शुअल महिलांमध्ये लठ्ठपणाचा धोका अधिक असतो.
– ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये एचआयव्ही, एसटीडी, मेंटल डिसॉर्डर याचा धोका जास्त असतो.
– त्याना आरोग्याच्या इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
– एलजीबीटी तरुणांमध्ये तंबाखू, दारू आणि ड्रग्स घेण्याचं प्रमाणही जास्त आढळतं.