धक्कादायक ! कटरनं पतीच्या शरीराचे केले तुकडे, समलैंगिक पत्नीला पुरूषांबद्दल होता द्वेष

जोधपूर : बाल विवाहाच्या 7 वर्षानंतर आपल्या समलैंगिक पत्नीला सासरी येण्यासाठी पती दबाव टाकू लागला, तेव्हा आपल्या बहिणींच्या मदतीने पत्नीने भयंकर षडयंत्र रचले. पतीला आपल्या बहिणींच्या घरी बोलावून नशेचे इंजेक्शन देऊन मारले आणि नंतर इलेक्ट्रिक कटरने हात, पाय आणि धड कापून पॉलिथीन बॅगमध्ये पॅककरून नाल्यात फेकले. हे खळबळजनक प्रकरण राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यातील आहे.

पुरुषांचा अतिशय द्वेष करणारी सीमा आपला पती चरण सिंहची मारेकरी निघाली. सीमाने आपल्या बहिणींसोबत मिळून अतिशय निर्दयीपणे पतीला मारले. इतकेच नव्हे, घरातील बाथरूममध्ये कटरने त्याचे हात, पाय आणि धडाचे तुकडे केले.

हा राग व्यक्त करण्याचे सीमाकडे केवळ एकच कारण होते, की ती पुरूषांचा द्वेष करत होती. दिर्घकाळापासून सीमाचे अनेक मुलींशी समलैंगिक संबंध होते. लहानपणी झालेल्या विवाहानंतर काही वर्षांनी जेव्हा पती चरण सिंहने तिला सासरी नेण्याची जिद्द केली तेव्हा सीमा प्रचंड संतापली.

तिने चरण सिंहला जोधपुरच्या बनाडमध्ये आपल्या भाड्याच्या घरात बोलावले आणि त्याच्यासोबत गौनाबाबत प्रेमाने चर्चा केली. यादरम्यान बहिणींनी चरण सिंहला ज्यूसमधून नशेचे औषध मिसळून प्यायला दिले आणि त्यानंतर काही इंजेक्शनसुद्धा दिली. ज्यामुळे चरण सिंह बेशुद्ध पडला आणि त्यानंतर त्याचा श्वास बंद पडला.

पती मेल्यानंतर सुद्धा सीमाचा राग शांत झालेला नव्हता, मग तिने बाथरूममध्ये चरणसिंहचा मृतदेह ठेवून इलेक्ट्रिक कटरने त्याचे सर्व अवयव कापले आणि नंतर ते एका पॉलिथीन बॅगमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी नाल्यात फेकून दिले. याचा खुलासा जोधपूर पोलिसांनी गुरूवारी केला.

जोधपुर कमिश्नरेटचे डीसीपी धर्मेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, सीमा, तिच्या बहिणी प्रियंका, बबीता आणि बहिणींचा एक मित्र भीयाराम जो घटनेत त्यांचा साथीदार होता, त्यांना अटक करण्यात आली आहे. चरणसिंहाच्या शरीराचे काही अवशेष अद्याप सापडलेले नाहीत, त्याचा शोध सुरू आहे. इलेक्ट्रिक कटर सुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे. शुक्रवारी सर्व आरोपींना कोर्टात सादर करून पोलीस रिमांड मागण्यात येईल.

तपासात समोर आले आहे की, मृत चरण सिंह उर्फ सुशील जाट हा मेडता येथील रहिवाशी होता आणि कृषी विभागात अधिकारी होता. त्याचा सीमाशी 2013 मध्ये बाल विवाह झाला होता. लग्नानंतर सुमारे 7 वर्षांपर्यंत सीमा आपल्या घरीच राहात होती. ती चरण सिंहच्या घरी गेली नव्हती.

मागील काही महिन्यांपासून मृत चरणसिंह उर्फ सुशील जाट आपल्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवू इच्छित होता. परंतु, त्याची पत्नी सीमाने त्यास नकार दिला आणि यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाददेखील झाले होते. यानंतर 10 ऑगस्टला सीमाने चरण सिंहला बनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या बहिणींच्या घरी बोलावले आणि त्याचा निर्घृन खून केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like