कमी पाणी पिता असाल तर वेळीच सावध व्हा ! होऊ शकतो ‘हा’ आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुम्ही जर कमी प्रमाणात पाण्याचं सेवन करत असाल तर तुम्हाला सिस्टायटीस हे संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. हे असं इंफेक्शन आहे ज्यात लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण करतं. यामुळं ब्लॅडर वॉलमध्ये सूज येते. हा काही गंभीर आजार नाहीये परंतु यामुळं लघवीच्या मार्गात जळजळ आणि वेदना होऊ शकतात. बॅक्टेरियल इंफेक्शनमुळं हे संक्रमण होते. महिलांच्या मुत्राशयाच्या आकार पुरुषांच्या तुलनेत लहान असल्यान त्यांना याचा धोका जास्त असतो. गर्भावस्थेत याचा जास्त धोका असतो. आज आपण याची लक्षणं, कारणं आणि काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत.

काय आहे सिस्टायटीस संक्रमणाचं कारण ?

पाणी कमी पिल्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडत नाहीत. यामुळंच पोटात बॅक्टेरिया तयार होतात. हेच बॅक्टेरिया मुत्राशयात पोचून संक्रमणांच कारण ठरतात. शरीरात कोणत्याही प्रकारचं संक्रमण झालं तर तरल पदार्थांचं सेवन करायला हवं.

काय आहे लक्षणं ?

– लघवी करताना जळजळ आणि वेदना होणं
– लघवी सोबत रक्त येणं.
– लघवीचा दुर्गंध
– कमरेच्या खालच्या भागात वेदना होणं
– सतत लघवी लागल्यासारखं वाटणं
– वयोवृद्धांना थकवा आणि ताप जाणवतो.
– सतत लघवी लागणं आणि लघवी कमी होणं

असा करा बचाव ?

सिस्टायटीस तेवढा गंभीर आजार नसल्यानं घाबरण्याचं काहीही कारण नाही. 3-4 दिवसात ही समस्या दूर करता येते. परंतु असं न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

– स्वच्छतेची काळजी घ्यावी
– तरल पदार्थांचं सेवन करावं
– जास्तीत जास्त पाणी प्यावं
– कॅफीन असलेले कोल्डड्रिंक्स किंवा कोल्डड्रिंक्सचं सेवन बंद करावं.
– मद्यपान किंवा धूम्रपान बंद करावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like