पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील डीएसकेंच्या धड्यावर आक्षेप 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

विद्यर्थ्याना  समाजातील आदर्श उद्योजक,व्यक्ती यांच्यासंदर्भातील धड्यांचा समावेश पाठयपुस्तकात केला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य विभागाच्या अभ्यासक्रमात ‘वास्तू उद्योगाचे अग्रणी डी. एस. कुलकर्णी’ अशा मथळ्याखाली एक धडा आहे. हे पुस्तक 15 जून 2013 साली छापण्यात आले  होते  आता खुद्द डीएसकेच आरोपी आहेत त्यामुळे, या पुस्तकातील धड्याचे करायचे काय असा प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठातील  प्रशासनाला निर्माण झाला आहे. या धड्याबाबत पुनर्तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी केली आहे.

आता डीएसके यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी अनेक आरोप झाले आहेत . सध्या ते येरवडा येथील  कारागृहात आहेत . त्यामुळे मुलांनी पाठयपुस्तकातील धड्यातून काय शिकायचं, काय बोध घ्यायचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी केला आहे. राज्य सरकारने हा धडा नाही तर पूर्ण पुस्तक मागे घ्यावं, त्याची पुनर्तपासणी करावी अशी मागणीही टकले यांनी केली आहे.

 [amazon_link asins=’B00IHS3RGQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’736974fa-7f8c-11e8-b29b-d56053efe1e3′]

असे आहेत आरोप

डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर डीएसकेंच्या मेहुणीलाही अटक झाली.