सांगली महापालिका निवडणूक ! घोडेबाजार सुरु ? ‘कमळ’ फुलते ठेवण्यासाठी दादा म्हणतात – ‘होऊ दे खर्च’

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची महापौर , उपमहापौर निवडणूक चांगली रंगतदार झाली आहे. नाराजीनाट्यानंतर आता सांगलीकरांना आता घोडेबाजार अनुभवायला मिळत आहे.

राजकारणात कधी काय होईल हे सांगाता येत नाही. त्यातच निवडणूक म्हंटल तर एखाद पद जिंकण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची तयारी असते. तसेच साम, दाम, दंड भेद या सूत्रीचाही वापर करण्यात येतो हे सर्वश्रुत आहे.सांगली महापालिका निवडणूकीत तर हेच पहायला मिळत आहे. भाजपने अडीच वर्षांत तीन-तीन महापौर आणि उपमहापौर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला दहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यासाठी सध्या जोरदार बॅटिंग सुरु आहे. जसे मटक्याचे आकडे जाहीर होतात. त्या पद्धतीने दावेदारांची नावे उघउ केली जात आहेत. त्यामुळे जुळणीतून नावे बाहेर आल्याने चेहरे तर खुलणारच ना. मग उरला प्रश्न तो नाराजांचा. ही नाराज मंडळी नॉटरिचेबल होतात. आणि संपूर्ण वातावरणच अस्थिर करतात. कारण ते विरोधकांच्या गळाला लागण्याची शक्यता असते. मग, सुरु होतो रुसवे फुगवे काढण्याचा प्रयत्न सुरु होतो आणि बोली लागते अर्थातच सुरु झाला तो घोडेबाजार.

घोडेबाजारत बोली लागते ती कधी रोकड्यात असते तर कधी कोणत्या तरी महत्त्वाच्या पदांचं गाजर दाखवल जात. यातून काही मार्ग निघाला नाही तर मग, दबावतंत्रही (भिती) वापरल. हे सर्व झाल्यानंतर एकदा सर्व काही ठिक झाल की, नाराजांना आणि सोबत येणाऱ्यांना सहलीवर पाठवल जात किंवा एखाद्या रिसॉर्टवर ठेवला जात. मग काय थेट त्यांचे आगमन मतदानावेळी केल जात. त्यांच्याकडून हवतसं मतदान करवून घेतलं जात. अलीकडे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणूकीत हेच सुरु झाल आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातही असा पायंडा पाडला गेला आहे. महापालिका आणि गोकूळ दूध संघाच्या पदाधिकारी निवडीत तर हाच प्रकार पहायला मिळतो.

कोल्हापूर महापालिका आणि गोकुळवर तिथल्या आप्पांची हुकूमत होती. त्यांनीही याचपद्धतीने आपली जरब तयार केली होती. त्यानंतर आली त्यांना तोडीस तोड असणारी दुसरी टोळी. आणि सुरु झाले टोळीयुद्ध. यामध्ये आप्पांची सत्तास्थाने उद्धवस्त झाली. आता तोच पॅटर्न कोल्हापूरचे दादा सांगलीत अजमावत आहेत.

सांगलीच्या महापालिकेमध्ये उपास तापास करुन दादांनी कमळ फुलवलं. काठावर का होईना सत्ता आणली. त्यानंतर हातात राज्यातल्या सत्तेच्या चाव्या होत्याच मग काय तळ्यात मळ्यात असणाऱ्यांची पाळेमुळे इथेच घट्ट करुन टाकली. यासाठी आधीच्या सत्ताधाऱ्यांचेच फॉम्युर्ले वापरले. या सर्व घडामोडींमुळे आयारामांच महत्त्व वाढलं आणि निष्ठावान बाजूला पडले. त्यामुळे कुरबुरी सुरू झाल्या.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणूकीत दादांनी कहरच केला आहे. पक्षातील अनेकांनी दोन्ही पंदांवर दावेदारी केली. त्यातून नाराजीही वाढली ही नाराजी थोपवण्यासाठी व सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भलताच उपाय सूचवला. तो म्हणजे या दोन्ही पदांची खिरापत वाटण्याचा. अडीच वर्षांत तीन-तीन महापौर आणि उपमहापौर करण्याचं दादांनी जाहीर केलं; पण पहिला नंबर कोणाचा, यावरून परत घमासान सुरु झाल. त्यातच पैलवानांच्या पुतण्यानंं डाव हाणला. पण कमळाच्या तंबूचे खांब हलू लागले. कारण या पुण्याची उपमहापौरपदाची कारकीर्द संपून वर्ष व्हायच्या आधीच पुन्हा महापौरपदाचं तिकीट पदरात पडल.

तर दुसरीकडे उपमहापौरपदासाठी कुपवाडकरांना गजाननाचा प्रसाद देण्याचं घोषित केलं. या सर्व घडामोडींमुळे बाकीचे अस्वस्थ झाले. त्यातच १२ जणांनी नॉट रिचेबलचा झटका दिला. आता तिघे सापडले पण बाकीचे नऊ गायब झाल्याची चर्चा आहे. अनेकांच्या कार्यालयाबाहेर बगलबच्च्यांची गर्दी पहयला मिळत आहे.

इस्लामपूरकर साहेबांनी केलेल्या जुळनीमुळे महापालिकेतल्या तत्कालीन महाआघाडीचे काही शिलेदार एकत्र येत आहे. त्यामुळे ओनली बापूंच्या बंगल्यावर आणि बागवानांच्या कार्यालयातही हीच लगबग. सांगलीत विजय बंगल्यासह पृथ्वीराजबाबांच्या बंगल्यावर वेगवेगळ्या बैठका सुरू झाल्यात. सांगली साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवरही वर्दळ वाढलेली आहे.

या सर्वाच्या पार्श्वभूमीवर कमळ कायम फुललेल ठेवण्यासाठी दादांनी फर्मान काढल्याच समजतयं. कितीही खर्च झाला तरी परवा करायची नाही वाट्टेल ते करायला लागले तरी चालेल पण सीट सोडाची नाही अस त्यांनी फमार्नात म्हंटल आहे. त्यातच पेठनाक्यावरून काल सांगलीत रसद पोहचल्याची दंवडी ऐकायला मिळत आहे. सध्या तर नॉटरिचेबलचा झटक्या देणाऱ्यां नऊ जणांसाठी शोधमोहिम आणि घोडेबाजर सुरु आहे. मात्र, दादा हा पॅटर्न सांगलीत का वापरतात हे समजत नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आणि परवाच मिरज पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत सांगली-मिरजकरांनी दाखवलेला इंगा बहुधा दादा विसरलेत अस दिसय. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु आहे काही बोलायलाच नको पण घोडेबाजार करणाऱ्यांना सांगली-मिरजकर विकून येतात, हा इतिहास दादांनी आठवणीत ठेवण्याची गरज आहे.