तर… अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून टाकू : मनसे 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उधळून टाकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अरुणा ढेरे या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत.

यवतमाळ मध्ये ११ जानेवारी रोजी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संमेलनाचे उद्घाटन इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान मराठी साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते उद्घाटन कशाला ? असे म्हणत मराठी साहित्यिकांच्या हस्ते जर या संमेलनाचे उद्घाटन होत नसेल तर हे मराठी साहित्य संमेलन उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आहेत. तसेच त्यांची साहित्येही देशभरात वाचले जात आहेत. मात्र असे असतांना सुद्धा मराठी साहित्य संमेलनात इंग्रजांच्या साहित्यिकाच्या हस्ते उद्घाटन कशाला ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर मराठी साहित्यिकांना का डावलले जात आहे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल ?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आहेत. इतकेच नव्हे तर. नयनतारा सहगल या देशात ‘पुरस्कार वापसी’ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत.  मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. इतकेच नव्हे तर राजीव गांधीच्या कार्यकाळात नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ या पुस्तकासाठी  साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरूणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.